दयानंद कोकाटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे सन्मान

कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सहाय्यक शिक्षक दयानंद बंडू कोकाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. खारेपाटण प्रशालेमध्ये ऑटो इंजीनियरिंग व्यवसाय अभ्यासक्रमाचे सहाय्यक शिक्षक दयानंद बंडू कोकाटे हे मागील चोवीस वर्षे या प्रशालेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या एका समारंभामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष बी. डी. पाटील, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, कोकण विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष टी. के. पाटील, माध्यमिक संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, महिला आघाडी प्रमुख अश्विनी गर्जे, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग काळे, संदीप शिंदे, अजय शिंदे तसेच शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी गजानन नानचे व इतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दयानंद कोकाटे यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव आत्माराम कांबळे, तसेच इतर सर्व संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक प्रकाश अकीवाटे, प्रभारी मुख्याध्यापक संजय सानप व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page