Headlines

खा राऊत यांनी घेतला विजयदुर्ग नळ पाणी योजनेचा आढावा

देवगडस्थानीक सरपंच व ग्रामस्थ यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून स्थानिक जलस्रोत्रावर आधारित नळ पाणी योजना कार्यन्वित केल्यास वाडीवाडी वरील गावागावातील पाणी समस्या मार्गी लागतील.त्याचबरोबर जलजीवन योजनेअंतर्गत नळपाणी योजना पूर्णत्वास आल्यानंतर पुरेसे व नियमित पाणी नागरिकांना मिळावे या करीता उपाययोजना कराव्यात. तसेच गाव पातळीवरील जलसाठ्यातील पाण्याची पातळी वाढविली तर पुरेसा पाणी साठा निर्माण होऊ शकतो.या पुढील…

Read More

पुढील काळात देखील केसरकर प्रवक्ते म्हणूनच राहोत

केंद्रित मंत्री नारायण राणे यांचा आमदार दीपक केसरकर यांना खोचक टोला ⚡सावंतवाडी ता.०८-: आपण आजपर्यंत अनेक प्रवक्ते पाहिले आहेत. त्यापैंकी आमदार दीपक केसरकर हे एक असून, केवळ प्रश्न विचारणे व उत्तर देणे हाच त्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे पुढील काळात देखील ते प्रवक्ते म्हणूनच राहोत, असा खोचक टोला केंद्रित मंत्री नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर…

Read More

होडावडा येथील पूरस्थितीच्या पाहणीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दाखल

⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात नदी नाल्यांना पूर येऊन पूर्णपणे सावंतवाडी-वेंगुर्ला वाहतुक ठप्प झाली होती. या पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी खुद्द जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे होडावडे नदीपात्रावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सपीय घाग, पोलिस अधिकारी, ट्राॅपिकचे कर्मचारी व अधिकारी, होडावडे सरपंच अदिती नाईक, उपसरपंच…

Read More

माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, ईप्तीकार राजगुरू यांनी जाधववाडी वस्तीला दिली भेट

कोसळत असलेल्या घळणीची पाहणी करत नागरिकांना दिला धीर ⚡सावंतवाडी ता.०८-: : भटवाडी व जाधववाडीतील माजी नगरसेविका अफरोज राजगुरू व ईप्तीकार राजगुरू यांनी आज भेट देत कोसळत असलेल्या घळणीची पाहणी केली व तेथील भयभीत झालेल्या नागरिकांना धीर दिला. याबाबत आपण प्रशासनाकडे योग्य अशी दाद मागू, असे जाधववाडीतील नागरिकांना आश्वासन दिले. अशा या परिस्थितीमध्ये शाब्दिक आधार दिल्यामुळे…

Read More

बळीराजासाठी एक दिवस उपक्रमांतर्गत आजगाव कोंडूरे शाळेने भरविली बांधावरची शाळा*

मुलांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन घेतला शेतीचा आनंद ⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव कोंडूरे या शाळेने बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला. मुलांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीविषयक माहिती घेत शेतातील विविध कामांचा आनंद लुटला.विध्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्धल आदर निर्माण व्हावा,शेती विषयी माहिती मिळावी,शेतीचे महत्व, बी बियाण्,शेतीची…

Read More

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीयेच्या विद्यार्थ्याने साजरा केला बळीराजा दिन

सावंतवाडी ता.०८-: बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बांधावर जाऊन बळीराजा दिवस साजरा केला आहे. यावेळी गावचे सरपंच विनायक उर्फ अब्जु सावंत, मुख्याध्यापक चौरे सर, गौरे सर, बांदेकर सर, पाटील सर, ग्रामसेवक परब, शिपाई रोशन सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता सावंत आदी उपस्थित होते.

Read More

शिवसेनेतील आजच्या परिस्थितीला खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोरदार टोला ⚡सावंतवाडी ता.०८-: शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार असून, एकाही आमदार आणि नगरसेवकाला सांभाळू न शकल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. असा असा जोरदार टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात ठाकरे सरकारने…

Read More

मुसळधार पावसामुळे बांदा येथे पूरसदृश्य परिस्थितीत निर्माण…

बांदा/प्रतिनिधीआज सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने बांदा शहरात पुराच्या शक्यतेने महसूलसह पोलीस व ग्रामपंचायतची यंत्रणा अलर्ट झाली आहे. बांदा परिसरातील अनेक गावात पुरस्थिती निर्माण झाल्याने या गावांचा बांदा शहराशी संपर्क तुटला आहे. शहरातील आळवाडी मच्छिमार्केट ते कट्टा कॉर्नर शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली…

Read More

बांदा येथे एन डी आर एफ चे पथक दाखल …

तेरेखोल नदिपात्राची केली पाहणी… ⚡बांदा ता.०८-: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन स्थितीत बचावकार्य करण्यासाठी बांदा शहरात आज दुपारी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. बांदा शहरातील पूरप्रवण क्षेत्र, बाजारपेठ तसेच तेरेखोल नदीपात्राची पाहणी या पाथकाने केली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक शामराव काळे, सरपंच अक्रम खान, उपनिरीक्षक समीर भोसले, महसूल मंडळ अधिकारी आर वाय राणे, तलाठी वर्षा…

Read More

समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. 8 जुलै ते 12 जुलै 2022 या कालावधीत 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 5.3 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर उसळण्याची शक्यता आहे. तरी समुद्र किनारी व खाडी किनारी राहणाऱ्या सर्व मच्छिमार व नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ…

Read More
You cannot copy content of this page