खा राऊत यांनी घेतला विजयदुर्ग नळ पाणी योजनेचा आढावा

देवगड
स्थानीक सरपंच व ग्रामस्थ यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून स्थानिक जलस्रोत्रावर आधारित नळ पाणी योजना कार्यन्वित केल्यास वाडीवाडी वरील गावागावातील पाणी समस्या मार्गी लागतील.त्याचबरोबर जलजीवन योजनेअंतर्गत नळपाणी योजना पूर्णत्वास आल्यानंतर पुरेसे व नियमित पाणी नागरिकांना मिळावे या करीता उपाययोजना कराव्यात.

तसेच गाव पातळीवरील जलसाठ्यातील पाण्याची पातळी वाढविली तर पुरेसा पाणी साठा निर्माण होऊ शकतो.या पुढील काळात निर्माण करण्यात येणारी नळपाणी योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्याकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार त्याचबरोबर या पूर्वी जाहीर केलेल्या नियोजन समिती मधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या पूर्वीच्या निधी बाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पाळेकरवाडी येथे आयोजित केलेल्या विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजना आढावा बैठकीत बोलताना केले.


प्रारंभी मान्यवरांचे स्वागत सरपंच कांशीराम पाळेकर यांनी केले.प्रास्तविक विलास साळसकर यांनी केले व नळपाणी योजनेची सविस्तर माहिती दिली.स्थानिक सरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ यांनी चर्चा करून यातउपसरपंच दीपक तोरस्कर, सरपंच कांशीराम पाळेकर,उपसरपंच सायरा मुल्ला फकीर सोलकर,अन्य यांनी चर्चेत सहभाग घेतला .

You cannot copy content of this page