कोसळत असलेल्या घळणीची पाहणी करत नागरिकांना दिला धीर
⚡सावंतवाडी ता.०८-: : भटवाडी व जाधववाडीतील माजी नगरसेविका अफरोज राजगुरू व ईप्तीकार राजगुरू यांनी आज भेट देत कोसळत असलेल्या घळणीची पाहणी केली व तेथील भयभीत झालेल्या नागरिकांना धीर दिला. याबाबत आपण प्रशासनाकडे योग्य अशी दाद मागू, असे जाधववाडीतील नागरिकांना आश्वासन दिले. अशा या परिस्थितीमध्ये शाब्दिक आधार दिल्यामुळे जाधववाडीतील लोकांनी माजी नगरसेविका अफरोज मॅडम यांचे खूप खूप आभार मानले.
