Headlines

कणकवलीत मालती केळुस्कर यांचे निधन

कणकवली 20 जुलै (परातीं)- कणकवली शहरातील बिजलीनगर येथील रहिवासी मालती लक्ष्मण केळुस्कर (९०) यांचे मंगळवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. जुन्या पिढीतील हॉटेल व्यवसायिक असलेल्या मालती केळुस्कर अनेकांच्या अन्नदात्या होत्या. हसतमुख मनमोकळा स्वभाव, दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाण्याचा त्यांचा स्थायीभाव शहरात त्या माई नावाने परिचित होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार…

Read More

शहरातील चिखल, कचऱ्याचे साम्राज्य हटवा

अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस रस्त्यावर उतरेल;तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांना न प प्रशासनाला इशारा ⚡सावंतवाडी ता.२०-: शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे चिखलाचे साम्राज्य पसरले असून ठीक ठिकाणी दुर्गंधी आणि डास उत्पत्ती होत आहे तरी याकडे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नागरिकांसह रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे….

Read More

‘सरपंच परिवार’ उपक्रम जिल्हासह राज्यातील सरपंचाना अनुकरणीय

विनायक ठाकूर;कणकवली तालुक्यातील सरपंचानी सादर केले विविध कार्यक्रम ⚡कणकवली ता.२०-: आपल्याला मिळालेली पदे ही काही कालखंडापूरती असतात मात्र माणूस म्हणून आपण माणूसकी जपून सबंध कायम जपले पाहीजेत.आपण आज सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जे स्नेहसंमेलनाचे आयोजन केलात हे जिल्हासह राज्यासाठी सरपंचाना अनुकरणीय आहे.असे जि.प.सिंधुदुर्ग उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यानी बेळणे येथिल आशिष मंगल…

Read More

थल सेना ट्रेनिंग कॅम्पमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना दिले योग प्रशिक्षण

⚡मालवण ता.२०-: ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन व एनसीसी अंतर्गत सुरू असलेल्या भारतीय थल सेना कॅम्प व कम्बाईन एनुयल ट्रेनिंग कॅम्प मध्ये लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी योग प्रशिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली योग साधकांनी योगाची वेगवेगळी आसने करून दाखवत त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या प्रशिक्षणाचा राज्यातील ३०७ एनसीसी कडेट्सनी लाभ घेतला….

Read More

ओझरम येथे नदीत मासेमारीसाठी गेलेला नांदगाव येथील इसमाचा बुडून मृत्यू

⚡कणकवली ता.२०-: ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेलेल्याकणकवली तालुक्यातील नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले(वय ५२) यांचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले हे १९ जुलैला दुपारी ३ वाजता ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते.नदीच्या काठावर ओझरम येथे गळ टाकून मासेमारी करत असताना सायंकाळी ४…

Read More

संजू परब यांनी घेतली भाजप नेते मोहित कंबोज यांची भेट

⚡सावंतवाडी ता.२०-: भाजप नेते मोहित कंबोज यांची सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी भेट म्हणून कंबोज यांनी रुद्राक्ष माळ दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावले बंटी पुरोहित उमाकांत वारंग आदी उपस्थित होते.

Read More

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत जाधव नियुक्त

⚡कणकवली ता.२०-:भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची बैठक कणकवली येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदीचंद्रकांत भोजू जाधव यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष निवड तसेच नवीन कार्यकारणी देखील करण्यात आली.भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी अनंत आसोलकर,सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा

⚡मालवण ता.२०-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी हॉटेल लीलांजली सभागृह, मालवण येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

Read More

देवळी समाज मालवणतर्फे ७ रोजी विद्यार्थी सत्कार व वधू-वर मेळावा

⚡मालवण ता.२०-:सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ मालवण शाखेतर्फे मालवण तालुक्यातील देवळी समाजातील इयत्ता चौथी- सातवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, दहावी, बारावी, पंधरावी, इंजिनिअरिंग, उच्च शिक्षित पदवी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ व वधू वर सूचक मेळावा दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता वायरी भूतनाथ येथील लौकिक न्याहारी निवास येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी…

Read More

कट्टा येथे वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन

⚡मालवण ता.२०-: भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्या संस्कार विभागातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी वर्षावासाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, तालुकाध्यक्ष सूर्यकांत कदम, मालवण संस्कार विभाग उपाध्यक्ष प्रकाश पवार, कोषाध्यक्ष संजय पेंडुरकर, सरचिटणीस रविकांत कदम, संरक्षण…

Read More
You cannot copy content of this page