‘सरपंच परिवार’ उपक्रम जिल्हासह राज्यातील सरपंचाना अनुकरणीय

विनायक ठाकूर;कणकवली तालुक्यातील सरपंचानी सादर केले विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.२०-: आपल्याला मिळालेली पदे ही काही कालखंडापूरती असतात मात्र माणूस म्हणून आपण माणूसकी जपून सबंध कायम जपले पाहीजेत.आपण आज सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जे स्नेहसंमेलनाचे आयोजन केलात हे जिल्हासह राज्यासाठी सरपंचाना अनुकरणीय आहे.असे जि.प.सिंधुदुर्ग उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यानी बेळणे येथिल आशिष मंगल कार्यालयात सर्वपक्षीय कणकवली तालुका सरंपच परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन 2022 कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर जि.प.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपूरे,कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,जि.प.विस्तार अधिकारी महादेव शिंगाडे,पं.स.विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग,रामचंद्र शिंदे याच्यासह कणकवली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व कुटंबिय उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळ सत्रात स्नेहसंमेलाना शुभारंभ होत विविध सांस्कृतिक कार्यक्रम,स्पर्धांना सुरवात करुन करण्यात आली.      
     
यावेळी बोलताना विनायक ठाकूर म्हणाले ,आज आपण पाच वर्षे संरपंच राहीलो या पाच वर्षातील पुढील चार महिने शिल्लक आहेत.यामध्ये आपण कोणते काम केले लोकांची काय गरज होती यासाठी आपण समाधानी आहात का याचे सिंहावलोकन करुन याचा विचार करणे गरजेचे आहे.कारण आपल्याकडून राहीलेली कामे पुढील चार महिन्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न करा यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.तसेच आपले गाव राळेगणसिद्धी,पाटोदा सारखे होण्यासाठी प्रयत्न करा असे सांगत पुढील वाटचालीस व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण  म्हणाले, जिल्हातील सरंपच संघटनापैकी कणकवली तालुका सरपंच संघटनेने आज सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जो स्नेहसंमेलन आयोजित केले हा नविन पायंडा पडला असून जिल्हातील सरपंच परिवारांचा पाहीला मेळावा कणकवली तालुक्याने अयोजित केल्याने आज सर्वांना शुभेच्छा देत यापुढे असाच सुरु ठेवा असे सांगितले.
यावेळी ओटव सरपंच हेमंत परुळेकर,शेर्पे सरंपचा निशा गुरव यांनी सरपंचाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत महिला सरपंचा मधून नांदगाव सरपंचा आफ्रोजा नावलेकर तर पुरुष सरपंचामधून बिडवाडी सरपंच सुदाम तेली यानी क्रमांक पटकाविला.तर दिवसभर विविध सांस्कृतिक व कला गुणांना वाव देणारे कार्यक्रम तालुक्यातील सरंपचांनी सादर कार्यक्रमात रंगत वाढवली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचलन वाघेरी सरंपच संतोष राणे व आभार करुळ संरपच कर्णिक यांनी केले.   

You cannot copy content of this page