थल सेना ट्रेनिंग कॅम्पमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना दिले योग प्रशिक्षण

⚡मालवण ता.२०-: ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन व एनसीसी अंतर्गत सुरू असलेल्या भारतीय थल सेना कॅम्प व कम्बाईन एनुयल ट्रेनिंग कॅम्प मध्ये लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी योग प्रशिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली योग साधकांनी योगाची वेगवेगळी आसने करून दाखवत त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या प्रशिक्षणाचा राज्यातील ३०७ एनसीसी कडेट्सनी लाभ घेतला. या प्रशिक्षणामुळे एनसीसी विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न राहण्यासाठी प्रेरणा मिळाली.

या प्रशिक्षणास लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, लायन सेक्रेटरी व योग साधक सौ.अनुष्का चव्हाण, लायन खजिनदार सौ. अंजली आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षिका व लायन सौ. जयश्री हडकर, योग प्रशिक्षिका सिद्धी माणगावकर यांनी योगा विषयी माहिती देत विविध योगासने करून घेत प्रत्येक आसनाचे महत्त्व समजावून सांगितले. तर योग साधक सौ. अनुष्का चव्हाण, योग साधक सौ. कमल बांदकर, सौ. केतकी सावजी, योग साधक सौ. नंदिनी गावकर यांनी योगाची विविध आसने करून दाखवली.

कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ सेना मेडल प्राप्त, ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंद्र सिंह, सुभेदार तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, नायब सुभेदार जितेंद्र तिवारी, सुभेदार आर एन भांजा, यांच्या अधिनस्त हे शिबीर सुरू आहे. तसेच एनसीसी असोसिएट ऑफिसर अधिकारी लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत सिंधुदुर्ग कॉलेज मालवण, द्वितीय अधिकारी आनंदा बामणीकर, तृतीय अधिकारी रविराज प्रधान एस. एम. हायस्कूल कणकवली, सागर गुरव माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम. आर. खोत यांनी केले तर आभार रविराज प्रधान यांनी मानले.

You cannot copy content of this page