देवळी समाज मालवणतर्फे ७ रोजी विद्यार्थी सत्कार व वधू-वर मेळावा

⚡मालवण ता.२०-:
सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ मालवण शाखेतर्फे मालवण तालुक्यातील देवळी समाजातील इयत्ता चौथी- सातवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, दहावी, बारावी, पंधरावी, इंजिनिअरिंग, उच्च शिक्षित पदवी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ व वधू वर सूचक मेळावा दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता वायरी भूतनाथ येथील लौकिक न्याहारी निवास येथे आयोजित करण्यात आला आहे.

तरी मालवण तालुक्यातील देवळी समाजातील बांधव व भगिनी, गुणवंत विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर (मोबा. ९४२१२३६३१८) व सचिव मारुती आचरेकर (मोबा.९४२२९६४१९०) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page