कणकवलीत मालती केळुस्कर यांचे निधन

कणकवली 20 जुलै (परातीं)- कणकवली शहरातील बिजलीनगर येथील रहिवासी मालती लक्ष्मण केळुस्कर (९०) यांचे मंगळवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले.

जुन्या पिढीतील हॉटेल व्यवसायिक असलेल्या मालती केळुस्कर अनेकांच्या अन्नदात्या होत्या. हसतमुख मनमोकळा स्वभाव, दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाण्याचा त्यांचा स्थायीभाव शहरात त्या माई नावाने परिचित होत्या.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. कणकवली शहरातील बिल्डर डेव्हल्पर शेखर केळुस्कर यांच्या मातोश्री तर हॉटेल न्यू समर्थचे मालक नितीन व रुपेश केळुस्कर यांच्या त्या आजी होत

You cannot copy content of this page