बांदा आपत्कालीन यंत्रणेची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात उद्भवणाऱ्या पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणाची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाहणी करत आढावा घेतला.


बांदा शहरात दरवर्षी पुरस्थिती उद्भवून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पूर अलर्ट यंत्रणा व बांदा इन्सुलिसाठी लाईफ बोट देण्यात आल्या आहेत. या यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी तेरेखोल नदीपात्राची देखील पाहणी करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्य पुंडलिक दळवी, इफ्तीकर राजगुरू, देवेंद्र टेमकर, श्री साईबाबा भक्तसेवा मंडळाचे विश्वस्त राकेश केसरकर उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी आपत्कालीन स्थितीत काहीही मदत लागल्यास तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page