⚡बांदा ता.१४-:* स्थानिक रोट्रॅक्ट क्लबच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी मिताली सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी संकेत वेंगुर्लेकर आणि खजिनदारपदी मयूर मसुरकर यांची निवड झाली आहे.
गेल्या कार्यकाळात रोट्रॅक्ट क्लबने सामाजिक भान जपत तब्बल ८० हून अधिक विविध उपक्रम व समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या वाटचालीला पुढे नेण्याचा निर्धार नूतन अध्यक्ष मिताली सावंत यांनी व्यक्त केला आहे. “गेल्या वर्षी झालेली कामे ही आमच्यासाठी प्रेरणादायी असून, या वर्षी अधिक उत्साहाने समाजोपयोगी व तरुणांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यावर आमचा भर असेल,” असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. रोट्रॅक्ट क्लबच्या या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच रोट्रॅक्टचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी मिताली सावंत; १८ ऑगस्टला होणार नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा…
