भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत जाधव नियुक्त

⚡कणकवली ता.२०-:
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची बैठक कणकवली येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी
चंद्रकांत भोजू जाधव यांची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष निवड तसेच नवीन कार्यकारणी देखील करण्यात आली.भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी अनंत आसोलकर,
सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार अंकुश विष्णू जाधव,
जिल्हा संघटक सरचिटणीस किरण देवेंद्र जाधव,अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस गुरुप्रसाद भगवान चव्हाण, अनु.जाती सिधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस विष्णू तेंडोलकर,अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली.
अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य म्हणून चंद्रकांत वालावलकर,दशरथ गावकर, सुधाकर जाधव, कृष्णा चव्हाण, अजित तांबे,गणेश तांबे,सुदेश किनवडेकर, बाळा जाधव,विलास कुडाळकर, राजन जाधव, प्रयाग कांबळे यांची निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page