Headlines

संकरीत दुधाळ जनावरांसाठी आदर्श गोट्या करिता मिळणार कर्ज

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.२५-: दुग्धव्यवसायात यशस्वी होणेसाठी चांगल्या प्रतिची संकरीत जनावरे खरेदीबरोबरच त्यांचा निवारा व व्यवस्थापन हा यशस्वी दुग्ध व्यवसाय होणेचे महत्वपूर्ण कारण आहे. यासाठीच संकरीत दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी आदर्श गोठा बांधणी करीता सुधारीत कर्जयोजना तयार करण्यात आल्याची माहीती जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी यांनी दिली. जिल्हा बँके मार्फत दुध…

Read More

ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी पगार तारणावर ओव्हरड्राफ्ट सुविधा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.२५-: जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानीत ग्रंथालयामध्ये काम करीत असलेल्या कर्मचा-यांचे वेतन हे शासनाकडून दिले जाते. मात्र हे वेतन दरमहा वेळीच जमा होत नाही. अनेक वेळा हे अनुदान सहा महीन्यांनी जमा होते. अशा कर्मचा-याना आर्थिक अडचण निर्माण होते व ते बँकेकडे कर्जाची मागणी करतात. त्यासाठी त्यांना पगारतारण ओव्हरड्राफ्ट सुविधा…

Read More

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्या सोडविण्यासाठी नागेश मोर्ये यांचे उपोषण

आ.वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर यांनी दर्शवला पाठींबा ⚡कणकवली ता.२५-; मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार नांदगाव सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील…

Read More

शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या तत्परतेने जखमी पक्ष्याला मिळाले जीवदान

वन विभागाचेही लाभले मौलिक सहकार्य सावंतवाडी : आज सकाळी शाळेमध्ये जात असताना आदर्श, उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सावंत यांना माडखोल धुरीवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक मोठा पक्षी अत्यंत जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी जराही विलंब न करता तात्काळ त्या पक्षाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गोवेकर यांच्या घरात निवारा देऊन, त्याला पाणी पाजले, दाणे देण्यात आले. त्यानंतर दत्ताराम…

Read More

नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत ९ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह

नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे: डॉ दत्ता तपसे ⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालूक्यातील नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या या आठवड्यात ९ आढळून आले आहे .यामुळे रुग्ण मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा कोरोना तपासणी केली जात आहे. व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. नांदगाव येथील कोरोना पॉझीटीव्ह संख्या ३ वर पोहचली आहे.तर नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत…

Read More

लायन्स क्लब हा सेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा क्लब

विरेंद्र चिखले;लायन्स क्लब ऑफ मालवण नूतन कार्यकारिणी पदग्रहण व शपथविधी सोहळा संपन्न* मालवण : (प्रतिनिधी) लायन्स क्लब हा सेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा क्लब आहे. मालवण लायन्स क्लब हा डिस्ट्रिक्ट स्तरावर नेतृत्व करू शकणारा सक्षम क्लब आहे. क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करावे. वर्षभराच्या कार्यकाळाची आठवण समाज काढेल असे गुणवत्ता पूरक…

Read More

काजू प्रक्रियेतून महिलांची आर्थिक बाजू झाली सक्षम

महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र यांचा प्रयत्न ⚡ओरोस ता.२५-: महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारा संचलित सातार्डा, घोगळवाडी येथील यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण केली आहे. महिला बचतगट म्हटल की आपसूकच लोणची पापड, मसाले ही उत्पादने समोर येतात. परंतू…

Read More

नवोदय विरोधातील भाजपच्या आंदोलनाला यश

तालुक्यातील परजिल्ह्यातील मुलांची संख्या घटली;जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई यांचा दावा वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्र शासनाच्यवतीने घेण्यात येणा-या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेप्रश्नी वेंगुर्ला भाजपाने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.परजिल्ह्यातील मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले असून वेंगुर्ला तालुक्यातून जिल्ह्याबाहेरील फक्त तीनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.

Read More

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राष्ट्रवादीचे सहकार्य

प्रांतिक सदस्य एम के गावडे यांचे आश्वासन वेंगुर्ला प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही अशीच उन्नती करावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्णतः सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी काळजी घ्या-पानवेकर

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय येथे सावंतवाडीचे प्रांत प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वराज्य महोत्सव‘ व १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘हर घर तिरंगा‘ या उपक्रमाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पानवेकर यांनी केले.

Read More
You cannot copy content of this page