महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्या सोडविण्यासाठी नागेश मोर्ये यांचे उपोषण

आ.वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर यांनी दर्शवला पाठींबा

⚡कणकवली ता.२५-; मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार नांदगाव सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही . या सर्व मुद्द्यांबाबत जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी जि . प . सभापती नागेश मोरये यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.शिवसेना आ.वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पाठींबा दर्शवला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पारकर,जेष्ठ पत्रकार गणेश जेठे, गजानन रेवडेकर ,नांदगाव माजी सरपंच शशिकांत शेट्ये, माजी समाज कल्याण सभापती मंगेश तांबे, प्रकाश सातवसे, शेखर राणे,शिवसेना शाखाप्रमुख राजा म्हसकर, सुनील आंबेरकर, गणेश बांदिवडेकर, श्यामसुंदर मोरये , गुरुप्रसाद साळुंखे, रेहमान पाटणकर, अबूबक्कर नावलेकर, सत्यविजय महाडेश्वर, संतोष साळुंखे,वसंत मोरे, समीर कुंभार,युवा सेना शाखाप्रमुख प्रफुल्ल तोरस्कर, बाबू माणगावकर,माजी चेअरमन रवींद्र तेली, अरुण बापार्डेकर, संजू शिरसाट,श्रीकांत नार्वेकर, अमोल तेली, पुणाजी चव्हाण, अब्दुल नावळेकर, सुभाष सावंत हे उपस्थित होते.

या आंदोलनाला शिवसेना नेते संदेश पारकर सतीश सावंत, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रदीप तळगावकर, कणकवली शहराध्यक्ष महेश तेली, प्रवासी संघटना अध्यक्ष मनोहर पाल्येकर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष दादा कुडतरकर आदी मान्यवरांनी पाठींबा दर्शवला.

You cannot copy content of this page