वन विभागाचेही लाभले मौलिक सहकार्य
सावंतवाडी : आज सकाळी शाळेमध्ये जात असताना आदर्श, उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सावंत यांना माडखोल धुरीवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक मोठा पक्षी अत्यंत जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी जराही विलंब न करता तात्काळ त्या पक्षाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गोवेकर यांच्या घरात निवारा देऊन, त्याला पाणी पाजले, दाणे देण्यात आले. त्यानंतर दत्ताराम सावंत यांनी फॉरेस्ट ऑफिस सावंतवाडी यांना याची कल्पना दिली. त्यांनीही तत्परता दाखवत फॉरेस्टर शांताराम गावडे, तसेच भरत कोळी यांना पाठवून पूर्ण सहकार्य केले.
दरम्यान त्या जखमी पक्ष्याला ते घेऊन पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना सावंतवाडी येथे घेऊन गेले. तात्काळ सहकार्य केल्याबद्दल सावंतवाडी वनविभाग, दाणोली वनविभाग, माडखोल वनविभाग यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यानंतर धुरीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कांदे यांनी गुगलवर सदर पक्ष्याबाब्त शोधल्यावर हा पक्षी पाण कावळा असल्याचे समजले. या कामी धुरीवाडी शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, डोंगरे, नागेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सिद्देश शिरसाठ, गोवेकर दाम्पत्य, अरविंद परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. धीक्ष्क सावंत यांनी सर्व पक्षीप्रेमींना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. एक जीव वाचविला याबद्दल सर्वांनाच समाधान वाटले.
दरम्यान भूतदया म्हणजे काय असते? ते माडखोल धुरीवाडी शाळेच्या बालकांनी प्रत्यक्ष अनुभवले.
