लायन्स क्लब हा सेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा क्लब

विरेंद्र चिखले;लायन्स क्लब ऑफ मालवण नूतन कार्यकारिणी पदग्रहण व शपथविधी सोहळा संपन्न*

मालवण : (प्रतिनिधी)

लायन्स क्लब हा सेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा क्लब आहे. मालवण लायन्स क्लब हा डिस्ट्रिक्ट स्तरावर नेतृत्व करू शकणारा सक्षम क्लब आहे. क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करावे. वर्षभराच्या कार्यकाळाची आठवण समाज काढेल असे गुणवत्ता पूरक काम मालवण लायन्स क्लबने करावे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट जीएसटी कॉर्डिनेटर विरेंद्र चिखले यांनी येथे बोलताना केले.

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या २०२२- ०२३ या वर्षाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा दैवज्ञ भवन मालवण येथे लायन्सचे MJF ला. विरेंद्र चिखले (डिस्ट्रिक्ट जीएसटी कॉर्डिनेटर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्षपदी निवड झालेल्या सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ. अंजली आचरेकर यांना विरेंद्र चिखले यांच्या हस्ते पदभार सुपूर्द करण्यात आला. तर नवीन पदाधिकऱ्यांसह संचालक मंडळाला शपथ देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर झोन चेअरमन सागर तेली, माजी अध्यक्ष विश्वास गावकर, माजी सचिव सौ. जयश्री हडकर आदी उपस्थित होते.

यावेळी माजी अध्यक्ष विश्वास गावकर, माजी सचिव जयश्री हडकर, माजी खजिनदार अनुष्का चव्हाण यांनी गत वर्षभरातील क्लबच्या कार्याचा अहवाल सादर करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी लायन्स क्लबच्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा तसेच सदस्यांच्या गुणवंत पाल्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर गरिबीशी झुंजत दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या कांदळगाव येथील भूमी आचरेकर हिचा लायन्सतर्फे विशेष सत्कार करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

यावेळी नूतन अध्यक्षा वैशाली शंकरदास म्हणाल्या, क्लबने आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावण्याचा आपण प्रयत्न करणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. वर्षभरातील सेवा कार्याचे नियोजन करतानाच स्वच्छ भारत अभियान, आरोग्य शिबिरे यांसह विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. तर सचिव अनुष्का चव्हाण यांनी एकजुटीने काम करताना डिस्ट्रिक्ट स्तरावर मालवण लायन्स क्लबला प्रथम दहा मध्ये स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. तर खजिनदार अंजली आचरेकर यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून जबाबदारी पार पाडू, असे सांगितले. यावेळी झोन चेअरमन सागर तेली यांनी मालवण क्लबने आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केला असून स्थायी कार्यावर क्लबने भर द्यावा, असे सांगितले.

यावेळी मालवण लायन्स क्लबचे प्रथम उपाध्यक्ष सहदेव बापार्डेकर, द्वितीय उपाध्यक्ष श्याम नार्वेकर, तृतीय उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, सह सचिव सौ. स्नेहा जामसंडेकर, सह खजिनदार सौ. मिना घुर्ये, टेल व्टिस्टर सौ. राधिका मोंडकर, टेमर सौ. सोनाली पाटकर, स्वच्छ भारत प्रतिनिधी सौ. रुपा कांदळगावकर, लायन क्वेस्ट सौ. दिक्षा गांवकर, मेंबरशिप चेअरमन सौ. जयश्री हडकर, पी. आर. ओ. राजा शंकरदास, जी. एम. टी. चेअरमन विराज आचरेकर, संचालक डॉ. शशिकांत झांट्ये, नाना साईल, महेश अंधारी, रुजारिओ पिंटो, मुकेश बावकर, उमेश नेरुरकर, अरविंद सराफ, उमेश शिरोडकर, मोहन पटेल, गणेश प्रभुलकर, अवधुत चव्हाण, उदय घाटवळ, महेश कारेकर, शांती पटेल यांसह सौ. स्वप्नाली नेरुरकर, सौ. पल्लवी तारी- खानोलकर, डॉ. दर्शन खानोलकर, प्रिया हिर्लोस्कर, सौ. सुजाता यादव आदी तसेच कुडाळ, सावंतवाडी, बांदा येथील लायन्स क्लब पदाधिकारी व इतर उपस्थित होते. सुत्रसंचालन उदय घाटवळ व स्नेहा जामसंडेकर यांनी केले. तर आभार अनुष्का चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page