राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी काळजी घ्या-पानवेकर

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय येथे सावंतवाडीचे प्रांत प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वराज्य महोत्सव‘ व १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘हर घर तिरंगा‘ या उपक्रमाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पानवेकर यांनी केले.

  यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव, निवती पोलीस निरीक्षक कदम, निवडणूक नायब तहसिलदार पाणमंद, डॉ.संजिव लिंगवत, नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर, डॉ.श्रीनिवास गावडे, रुपाली पाटील, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, वेंगुर्ला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, डॉ. प्रसाद साळगावकर आदी उपस्थित होते. तालुकास्तरावर ८ ऑगस्ट रोजी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विशेष ग्रामसभा, ९ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा‘ उपक्रमानिमित्त प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना व घरावर तिरंगा, घरासमोर सडारांगोळी, तोरण, प्रभात फेरी, गावातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिक यांच्याशी चर्चा, १० ऑगस्ट रोजी प्रसिध्द वारसास्थळे - रेडी यशवंतगड, शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह, डच वखार आदी ठिकाणाची स्वच्छता मोहिम, ११ ऑगस्ट रोजी गावाच्या इतिहासाविषयी तरुण पिढीला मार्गदर्शन, १२ ऑगस्ट रोजी मोबाईल दुष्परिणाम विषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अर्थसाक्षरता विषयी मार्गदर्शन, १३ ऑगस्ट रोजी ‘गोपालाची पंगत‘ उपक्रमातंर्गत गावातील दानशूर व्यक्तीमार्फंत सकस आहार वाटप, शेतकरी मेळावे, जमिनीचे आरोग्य सुधारणे अंतर्गत उपक्रम राबविणे, १४ ऑगस्ट रोजी पर्यावरण संवर्धन विषयक शपथ, १५ ऑगस्ट रोजी आरोग्य विषयक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, १७ ऑगस्ट रोजी स्वराज्य फेरी, देशभक्तीपर चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता समारोप होणार आहे, अशी माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली. तर पानवेकर यांनीही स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा विषयी माहिती दिली.
You cannot copy content of this page