Headlines

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 12.8 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-: गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 12.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 7.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1872.0 मि.मी. पाऊस झाला आहे.

Read More

जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक दिव्यांग विद्यार्थी आहेत की जे त्यांना व्याधी असूनही नियमित शाळेत जातात, यातील सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती असते असे नाही. याही परिस्थितीवर मात करत हे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत ते शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून दुर्ग मावळा प्रतिष्ठान,…

Read More

आजगावला स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२६-: ग्रामपंचायत आजगावतर्फे जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा जि. प. केंद्रशाळा आजगाव नं. १ ता. सावंतवाडी येथे होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत आजगाव विविध कार्यक्रमातून देशभक्तीविषयक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दुपारी २.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीविषयक…

Read More

राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक शाखेने दिली सीईओ यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत पी एफ एम एस योजनेच्या प्रिंट ॲडव्हाइसबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की,यापूर्वी प्रचलित पद्धतीनुसार अनुदान खर्च करताना मुख्याध्यापक हे पुरवठादाराला अथवा दुकानदाराला धनादेश द्यायचे व त्याच्याकडून पावती घेऊन व्हाउचर फाईलला ठेवायचे व कालांतराने बँकेत जाऊन खर्ची घातलेल्या सर्व…

Read More

आंबोली सरपंच पदासाठी उद्या होणारी निवडणूक बेकायदेशीर

स्थगिती द्या: शिवसेनेच्या बबन गावडे यांची मागणी ⚡आंबोली, ता.२६-: आंबोली ग्रामपंचायतीची सरपंच निवड ही उद्या बेकायदेशीर आणि अवैध रित्या एक सदस्य मृत्यू झाल्यानंतर पोट निवडणूक घेण्याआधी कोरम नसताना निवडणूक विभागाने उद्या दिनांक २७ रोजी घोषित केली आहे.त्यावर वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे…

Read More

माणगाव खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २८ रोजी सत्कार

भाजप नेते निलेश राणे यांची उपस्थिती;उद्योजक विशाल परब मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ:भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने माणगाव खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम माणगाव येथील राधाकृष्ण नाट्य मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हा भव्य…

Read More

मालवण येथे पाच दिवस योग शिबिराचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ७ ऑगस्ट पर्यंत पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा संध्याकाळी ५ ते ५.३० व ५.३० ते ७ यावेळेत योग शिबिर तसेच ४ ते ६ आँगस्ट…

Read More

हडी जेष्ठ नागरिक संघाकडून गुणवंतांचा सन्मान

⚡मालवण ता.२५-: मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने हडी गावातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. गावातील दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले , सचिव सुभाष वेंगुर्लेकर यांच्या जवळ १ ऑगस्ट २०२२ पूर्वी देणे आवश्यक आहे. संबंधित विध्यार्थ्यांनी संपर्क…

Read More

गवंडीवाड्यातील निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना रिक्षा संघटनेकडून आर्थिक मदतीचा हात

⚡मालवण ता.२५-: मालवण गवंडीवाडा भागातील एक निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना मालवण शहरातील रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी ११ हजार २५१ रुपयाची आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला आहे. गवंडीवाड्यातील राजश्री गावडे या एका पायाने दिव्यांगही असून त्या संपूर्ण निराधार असल्याचे समजताच रिक्षा संघटनेतील काही सदस्यांनी फारसा गाजावाजा न करता आज दुपारी त्यांना भेटून आर्थिक मदत केली…

Read More

कळसुली ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्ते खड्ड्यांमुळे झाले त्रस्त ;रस्त्यातच वृक्षारोपण

सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध ⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद दिंडवणे केंद्र शाळा केंद्र नं. 2 च्या शाळकरी विद्यार्थ्यांना भल्या मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. याकडे सा. बां. विभागाचा मात्र दुर्लक्ष झालेला होता. सा. बां. विभागाला जाग येण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्तेंसह ग्रामस्थ एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक…

Read More
You cannot copy content of this page