भाजप नेते निलेश राणे यांची उपस्थिती;उद्योजक विशाल परब मित्रमंडळाचे आयोजन
कुडाळ:भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने माणगाव खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम माणगाव येथील राधाकृष्ण नाट्य मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हा भव्य दिव्य कार्यक्रम माजी खासदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. “पुन्हा एकदा आमचे नेते निलेश राणे साहेब माणगाव खोऱ्याच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, स्वागत करूया आपल्या लाडक्या नेत्याचे” या आशयाचे बॅनर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झळकू लागले आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता निलेश राणे यांचे माणगाव येथील श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे आगमन होणार आहे.यानंतर माणगाव हायस्कूलच्या इमारतीची पाहणी करणार आहेत.
यानंतर माणगाव हायस्कूल येथील श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामीं महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. निलेश राणे ह्यांची संस्थाचालकांबरोबर महत्वपूर्ण बैठक होणार आहे.भौतिक सोयी सुविधा बाबत ते संस्थाध्यक्ष सगुण धुरी यांच्यासह सर्व संचालक मंडळाशी चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर ११.४५ वाजता राधाकृष्ण नाट्यमंदीर येथे त्यांचे आगमन होणार आहे.त्यानंतर बारा वाजता माणगाव हायस्कूलच्या दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तर १०० टक्के निकाल लावणारा माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तर नुतन संस्थाचालक यांचाही सत्कार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यानंतर माणगाव हायस्कूल च्या तब्बल ५०० विद्यार्थी वर्गाला मोफत दप्तर वाटप करण्यात येणार आहे. माणगाव हायस्कूल ला यापूर्वीच लाखो रूपये देवून आर्थिक मदत करणारा राणे कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करून निलेश राणे यांचा भव्य दिव्य सत्कार संस्थेच्या व शाळेच्या वतीने करण्यात येणार आहे.मोफत दप्तर देवून शाळेचे ऋण फेडणारे युवा उद्योजक व माजी विद्यार्थी विशाल परब यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी दीड वाजता माणगाव येथील श्री.दत्त मंदिरात निलेश राणे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते विशाल परब,संस्थाध्यक्ष सगुण धुरी व मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले आहे.