आंबोली सरपंच पदासाठी उद्या होणारी निवडणूक बेकायदेशीर

स्थगिती द्या: शिवसेनेच्या बबन गावडे यांची मागणी

⚡आंबोली, ता.२६-: आंबोली ग्रामपंचायतीची सरपंच निवड ही उद्या बेकायदेशीर आणि अवैध रित्या एक सदस्य मृत्यू झाल्यानंतर पोट निवडणूक घेण्याआधी कोरम नसताना निवडणूक विभागाने उद्या दिनांक २७ रोजी घोषित केली आहे.त्यावर वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी केली आहे.

आंबोली ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच गजानन पालेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हे पद रिक्त झाल्यामुळे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे.वास्तविक कोणत्याही संस्था अगर मंत्रिमंडळ किंवा प्रमुख वेक्ती याचा मृत्यू झाल्यानंतर सर्व निवड या बरखास्त होतात.आंबोली ग्रामपंचायत ही ११ सदस्य असून त्यातील सरपंच पदावरील वेक्ती मृत झाल्याने या ठिकाणी पोट निवडणूक प्रलंबित आहे.भाजप कडे ६ सदस्य आहेत आणि शिवसेनेकडे ४ सदस्य आहेत.ग्रामपंचायत निवडणूक ही सरपंच वेक्ती मृत झाल्याने या ठिकाणी पोट निवडणूक घेवूनच घेणे आवश्यक आहे असे असताना त्या वॉर्ड मधील सदस्य पद पोटनिवडणूक घेवून घाई गडबडीने सरपंच आणि उप सरपंच निवडणूक घेणे हे हेतुपुरस्सर आणि अवैध आहे.शासनाने आणि निवडणूक आयोगाने ११ सदस्य कोरम पूर्ण झाल्याशिवाय पोट निवडणूक होईपर्यंत या सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी येथील बबन गावडे यांनी ग्रामस्थांतर्फे केली आहे.

You cannot copy content of this page