⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत पी एफ एम एस योजनेच्या प्रिंट ॲडव्हाइसबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की,यापूर्वी प्रचलित पद्धतीनुसार अनुदान खर्च करताना मुख्याध्यापक हे पुरवठादाराला अथवा दुकानदाराला धनादेश द्यायचे व त्याच्याकडून पावती घेऊन व्हाउचर फाईलला ठेवायचे व कालांतराने बँकेत जाऊन खर्ची घातलेल्या सर्व रकमांची पासबुक वरती एकाच वेळी प्रिंट घ्यायचे. यामुळे मुख्याध्यापक बँकेत एकदाच जायचे. परंतु मार्च २०२२ पासून शासनाने शाळेचे सर्व प्रकारचे अनुदान पी एफ एम एस मार्फतच खर्च करण्याचे अनिवार्य केले.
त्यामुळे शिक्षक या पोर्टलवरून शिक्षक अनुदान खर्च करतात व ते खर्च केलेले अनुदान मान्यतेसाठी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडे ऑनलाइन फॉरवर्ड करतात, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे त्यांच्या यूजर आयडी आणि पासवर्ड ने लॉगिन करून सदर खर्चाला मान्यता देतात, अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर सदर अनुदानाचे प्रिंट ऍडव्हान्स तयार होते व ते मुख्याध्यापक यांच्या लॉगीन ला उपलब्ध होते, मुख्याध्यापक या प्रिंट ऍडव्हान्स ची प्रिंट घेऊन त्यावर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांची स्वाक्षरी व स्वतः सचिव म्हणून स्वतःची स्वाक्षरी करून सदर प्रिंटे ॲडव्हाइस बँकेत सादर करतात. पूर्वी शिक्षक धनादेश दुकानदारांना द्यायचे पण पी एफ एम एस अंतर्गत अनुदान खर्च केल्यानंतर प्रिंट ॲडव्हान्स स्वतः मुख्याध्यापकांना बँकेत जाऊन द्यावे लागते.सदर प्रिंट ऍडव्हान्स पोर्टल वरतीच तयार होत असल्याने व त्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची अनुमती असल्याने तेच मान्य करून सदरचे प्रिंटेड व्हाईस बँकेला परस्पर उपलब्ध व्हावे अथवा बँकेला ई-मेल करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी अथवा पोर्टल वरून पैसे सरळ हस्तांतरण करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असे शिक्षक परिषदचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली.