आजगावला स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२६-: ग्रामपंचायत आजगावतर्फे जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा जि. प. केंद्रशाळा आजगाव नं. १ ता. सावंतवाडी येथे होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत आजगाव विविध कार्यक्रमातून देशभक्तीविषयक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दुपारी २.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीविषयक जाणीव जागृतीसाठी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शाळांनी १३ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करुन या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच यांनी केले आहे. स्पर्धेतील यशस्वी संघांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा पहिली ते आठवी, १५ ऑगस्ट रोजी वेळ दुपारी २.३० ते ५, सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे, स्पर्धेतील बक्षिसे खालीलप्रमाणे १. प्रथम क्रमांक रोख १५०० रुपये, प्रमाणपत्र व चषक द्वितीय क्रमांक रोख १००० रुपये व प्रमाणपत्र व चषक ३. तृतीय क्रमांक रोख ५०० रुपये, प्रमाणपत्र व चषक ४. उत्तेजनार्थ क्रमांक ३०० रुपये, प्रमाणपत्र व चषक (दोन बक्षिसे), स्पर्धेचे नियम – १) देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेसाठी गीत देशभक्तीपरच असावे. २) एका शाळेचा एकच संघ सहभागी होऊ शकतो. ३) स्पर्धेसाठी फक्त तबला, पेटी, ढोलकी, ढोलक, पखावज, बासरी यासारखी पारंपरिक वाद्येच वापरणे बंधनकारक आहेत. इलेक्ट्रॉनिक वाद्ये वापरु नये. ४) समूहगीतातील एका गटात व्यासपीठावर १० विद्यार्थीच सहभाग घेऊ शकतात. ५) शालेय गणवेशात गीत सादर करावे. ६) वाद्यवृंद संघाचा स्वत:चा असेल. ७ वादक विद्यार्थी, शिक्षक किंवा अन्य ग्रामस्थ वादक यांचा सहभाग घेऊ शकता. अधिक माहितीसाठी सुप्रिया वाडकर – मेस्त्री, सरपंच आजगाव (०९४२००४९७३८) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page