गवंडीवाड्यातील निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना रिक्षा संघटनेकडून आर्थिक मदतीचा हात

⚡मालवण ता.२५-: मालवण गवंडीवाडा भागातील एक निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना मालवण शहरातील रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी ११ हजार २५१ रुपयाची आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला आहे.

गवंडीवाड्यातील राजश्री गावडे या एका पायाने दिव्यांगही असून त्या संपूर्ण निराधार असल्याचे समजताच रिक्षा संघटनेतील काही सदस्यांनी फारसा गाजावाजा न करता आज दुपारी त्यांना भेटून आर्थिक मदत केली आहे.

यावेळी रिक्षा संघटनेतील सदस्यांमध्ये अध्यक्ष पपू कद्रेकर, हेमंत कांदळकर, निलेश लुडबे, विद्या तांडेल, आंबेरकर, कांबळी, मनोज धुरी, गांवकर आणि काही अन्य सेवाभावी सदस्यांची ही सामाजिक बांधिलकी सध्या मालवणात प्रशंसेचा विषय आहे.

यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पपू कद्रेकर व हेमंत कांदळकर व सहकार्यांनी इतर सामाजिक संस्था व दानशूर लोकांनाही राजश्री गावडे यांना यथाशक्ती मदत करावी असे सांगितले आहे.

You cannot copy content of this page