हडी जेष्ठ नागरिक संघाकडून गुणवंतांचा सन्मान

⚡मालवण ता.२५-: मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने हडी गावातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

गावातील दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले , सचिव सुभाष वेंगुर्लेकर यांच्या जवळ १ ऑगस्ट २०२२ पूर्वी देणे आवश्यक आहे. संबंधित विध्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, माजी सचिव चंद्रकांत पाटकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page