Headlines

शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाची नारळ लढविणे स्पर्धा स्थगित

⚡मालवण ता.११-: मालवण येथील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा निमित्ताने सोन्या-चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव असणारी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा जोरदार पाऊस व वारे यामुळे स्थगित करण्यात आली आहे. आयोजकांच्या वतीने शुक्रवारी १२ रोजी बैठक घेऊन स्पर्धेची पुढील तारीख निश्चित केली जाईल. अस्सल सोन्याची चार नाणी, सोन्या चांदी पासून बनवलेला नारळ, सोन्याची…

Read More

मळगाव घाटीत वादळी वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या रस्त्यावर

एकेरी वाहतूक सुरू : प्रशासनाचे दुर्लक्ष ⚡सावंतवाडी ता.११-: सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे डी के टुरिझम जवळ झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने मळगाव घाटीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. दोन-चार ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. याबाबतची अधिक माहिती…

Read More

कुडाळ भाजपच्यावतीने विविध ठिकाणी नारळ अर्पण

रिक्षा व्यवसायिकांना केले तिरंगा वाटप : भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चोख जबाबदारी ⚡कुडाळ ता.११-: प्रतिवर्षी प्रमाणे कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेनिमित्त ढोल ताशाच्या गजरात कुडाळ भाजपा कार्यालय ते गांधी चौक, कुडाळ बाजार, पेठ पान बाजार गुलमोहर हॉटेल,मार्ग भंगसाळ ह्या ठिकाणी नारळ अर्पण करण्यात आले. तसेच कुडाळ रिक्षा संघटना यांचं देखील प्रतिवर्षी प्रमाणे…

Read More

सागराला श्रीफळ अर्पण करीत साजरी झाली नारळी पौर्णिमा

बंदर जेठी येथे मोठा उत्साह;उद्योगपती, अधिकारी, नागरिक यांची मोठी उपस्थिती ⚡देवगड ता.११-: देवगड व आजूबाजूच्या परिसरात नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात सागराला श्री फळ अर्पण करून साजरा करण्यात आला. देवगड येथील बंदर परिसरात ठिकाणी शासकीय पूजा मोठ्या उत्साहात पार पडली . यावेळी उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे ,,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर पोलीस प्रतिनिधी पोलीस नाईक प्रवीण…

Read More

महापुरुष मित्रमंडळाचा ‘स्वामी चमत्कार ‘चित्ररथ देखावा लक्षवेधी

⚡कणकवली ता.११-: काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने देव भावाचा भुकेला या पौराणिक कथेवर आधारित ‘स्वामी चमत्कार ‘ हा चित्ररथ देखावा सादर केला. हा देवाखा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.काशीविश्वेश्वर मंदिरात ४ ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या शेवटच्या सातव्या  दिवशी महापुरुष मित्रमंडळाने केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. यामध्ये आकाशातून पडणारे पाणी…

Read More

सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी कणकवली येथे केले आवाहन ⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्र राज्याचा विचार करता गेल्या अडीच वर्षात शिवसेना पक्षाने महाविकास आघाडी करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि त्यामुळे ते लोकाभिमुख सरकार चालू शकले नाहीत. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा जनतेला देऊ शकले नाहीत. आता महाराष्ट्र राज्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार…

Read More

कळसूलकरच्या विद्यार्थ्यांनी दिली एसपीके महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाला भेट

⚡सावंतवाडी ता.११-: कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्राणी शास्त्र विभागाला भेट दिली यामध्ये त्यांनी मासे व गोड्या पाण्यातील मासे पाहिली.प्राणीशास्त्र प्रयोगशाळेतील विविध उपकरणे ज्यामध्ये लॅमिनेट एअर फ्लो , इनक्यूबेटर,विविध प्रकारचे एक्वा रीडर्स फिश, विविध प्राण्यांचे आकार व त्यांच्या हाडांची रचना इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांनी पाहिल्या. फुलपाखरे,ग्रास-ऑफर, भुंगे यांचे विविध प्रकार देखील पाहिले….

Read More

पणदुर सिद्धवाडी येथे जाळ्यात अडकले खवले मांजर

वैद्यकीय उपचार करीत सोडण्यात आले रानात..* ⚡कुडाळ ता.११-: पणदूर येथील सिद्धवाडी येथील मदन शिरोडकर यांच्या घरानजीक संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये एक वयस्कर नर जातीचे खवले मांजर अडकल्याचे शिरोडकर गुरुजी यांच्या लक्ष्यात आले त्यानी सरपंच दादा साईल यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सरपंच दादा साईल यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करत या खवले मांजराला सुरक्षितरित्या जाळ्यातून बाहेर…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट रोजी आनंदोत्सव रॅली

पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र मंडळाचे आयोजन कणकवली,11 ऑगस्ट(प्रतिनिधी) सध्या संपूर्ण देशात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र या मंडळाच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने १३ ऑगस्ट रोजी पटकीदेवी मंदिरापासून…

Read More

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागेश मोरये उपोषण करणार

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माजी सभापती नागेश मोरये यांनी सोमवार १५ ऑगस्ट, २०२२ रोजी पुन्हा उपोषणाचा एल्गार जाहीर केला आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या उपोषणात सहभागी होऊन अन्यायाला वाचा फोडा, तसेच जोपर्यंत मुंबई-गोवा चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल भरू नका. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वाहनांना टोल मधून मुक्ती…

Read More
You cannot copy content of this page