स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट रोजी आनंदोत्सव रॅली

पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र मंडळाचे आयोजन

कणकवली,11 ऑगस्ट(प्रतिनिधी) सध्या संपूर्ण देशात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र या मंडळाच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्ताने १३ ऑगस्ट रोजी पटकीदेवी मंदिरापासून आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आनंदोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य आनंदोत्सवाच्या धर्तीवर अबालृद्धांच्या कलागुणांचे प्रदर्शन व प्रत्येक घरात दिव्या- पणत्यांची रोषणाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी समस्त शहरवासीयांनी देशाप्रती सन्मान दाखवून स्वातंत्र्याच्या आनंद उत्सवामध्ये सहभागी व्हावे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र मित्रमंडळ यांच्यामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी योगेश ताम्हाणेकर 9420261850, राजा कवडे 9420822355 आणि राजा पाटकर 9860380738यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page