एकेरी वाहतूक सुरू : प्रशासनाचे दुर्लक्ष
⚡सावंतवाडी ता.११-: सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे डी के टुरिझम जवळ झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने मळगाव घाटीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. दोन-चार ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की मळगाव घाटातील झाडे ही धोकादायक बनली आहेत गेली कित्येक वर्षा ही धोकादायक झाडी तोडवी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग यांच्याकडे ग्रामस्थ वाहन चालकांकडून होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. आज झालेल्या सुसाटच्या वाऱ्य मध्ये काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे घाटीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे
