शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाची नारळ लढविणे स्पर्धा स्थगित

⚡मालवण ता.११-: मालवण येथील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा निमित्ताने सोन्या-चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव असणारी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा जोरदार पाऊस व वारे यामुळे स्थगित करण्यात आली आहे.

आयोजकांच्या वतीने शुक्रवारी १२ रोजी बैठक घेऊन स्पर्धेची पुढील तारीख निश्चित केली जाईल. अस्सल सोन्याची चार नाणी, सोन्या चांदी पासून बनवलेला नारळ, सोन्याची नथ, चांदीचे दिवे, पैठणी असा लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा बंदर जेटी येथेच भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केली जाईल. अशी माहिती आयोजन शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या वतीने देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी महिला नारळ लढवणे स्पर्धा अशी ओळखप्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला स्पर्धक मालवण बंदर जेटी येथे दाखल झाले होते. शेकडो स्पर्धकांची नाव नोंदणीही झाली होती. तसेच स्पर्धे निमित्ताने कोळीनृत्य व कोंबडा नृत्य यासाठीही कलाकार दाखल झाले होते..

मात्र मुसळधार पाऊस व वारे यामुळे अपेक्षित पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याने सर्वानुमते स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लवकरच ही स्पर्धा होणार आहे. अशी माहिती शिल्पा खोत यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page