कुडाळ भाजपच्यावतीने विविध ठिकाणी नारळ अर्पण

रिक्षा व्यवसायिकांना केले तिरंगा वाटप : भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चोख जबाबदारी

⚡कुडाळ ता.११-: प्रतिवर्षी प्रमाणे कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेनिमित्त ढोल ताशाच्या गजरात कुडाळ भाजपा कार्यालय ते गांधी चौक, कुडाळ बाजार, पेठ पान बाजार गुलमोहर हॉटेल,मार्ग भंगसाळ ह्या ठिकाणी नारळ अर्पण करण्यात आले. तसेच कुडाळ रिक्षा संघटना यांचं देखील प्रतिवर्षी प्रमाणे मोलाचं सहकार्य लाभले.तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व रिक्षा व्यवसायिकांना तिरंगा वाटप करण्यात आला. कुडाळ भाजप तालुधक्यक्ष विनायक राणे यांनी तसेच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जबाबदारी अगदी उत्तमपणे पार पाडली.

भारतीय जनता पार्टी कुडाळ वतीने नारळी पौर्णिमा निमित्त काढण्यात आलेल्या रॅली मध्ये भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे,ओबीसी मोर्चा सेल जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,युवा नेते आनंद भाई शिरवलकर,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे,युवा मोर्चा ता अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,नगरसेवक अभिषेक गावडे,निलेश परब,गणेश भोगटे, ऍड राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर,प्राजक्ता बांदेकर,कु चांदणी कांबळी,राजेश पडते,रिक्षा संघटनेचे अविनाश पाटील ,श्री विलास वराडकर,मनीष सडवेलकर,रवी जाधव,सचिन शेलटे,संजय गावडे,संजय साळगांवकर,भावजी शेख,आबा दळवी,महादेव कुडाळकर,बाबू तळवडेकर,बाळा कुंभार,बाळा कुडाळकर भारतीय जनता पार्टीचे सर्व रिक्षा व्यवसायीक तसेच युवा मोर्चाचे चंदन कांबळी,अनुप जाधव,स्वरूप वाळके,देवराज राणे,प्रसन्न गंगावणे,शैलेश दळवी,अक्षय बाईत,संदेश सुकळवाडकर सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page