कळसूलकरच्या विद्यार्थ्यांनी दिली एसपीके महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाला भेट

⚡सावंतवाडी ता.११-: कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्राणी शास्त्र विभागाला भेट दिली यामध्ये त्यांनी मासे व गोड्या पाण्यातील मासे पाहिली.प्राणीशास्त्र प्रयोगशाळेतील विविध उपकरणे ज्यामध्ये लॅमिनेट एअर फ्लो , इनक्यूबेटर,विविध प्रकारचे एक्वा रीडर्स फिश, विविध प्राण्यांचे आकार व त्यांच्या हाडांची रचना इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांनी पाहिल्या.

फुलपाखरे,
ग्रास-ऑफर, भुंगे यांचे विविध प्रकार देखील पाहिले. इत्यादी गोष्टी दाखविल्याबद्दल प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांचे आभार त्याचबरोबर डॉ. पी.पी. सावंत प्राणीशास्त्र विभाग प्रमुख यांचे देखील आभार.
डॉ. गणेश मरगज , प्रा. एस. एच.महापुरे, प्रा. शलाका वालावलकर, प्रा.रवीना गवस यांचे देखील आभार. कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका एम एम कदम त्याचप्रमाणे एनसीसी अधिकारी गोपाळ गवस हे देखील उपस्थित होते आजादीक अमृत महोत्सव साजरा होत असून या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रयोगशाळेची माहिती करून देण्यात आली

You cannot copy content of this page