Headlines

कोळंब येथे २४ पासून बोट सुरक्षितता प्रशिक्षण

⚡मालवण ता.२०-: जिल्हाधिकारी आणि बंदर विभाग तसेच पर्यटन संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यातर्फे दि. २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी १ व २ ते ४ या वेळेत जलक्रीडा व्यावसायिक आणि बोट चालक यांच्यासाठी विनामूल्य बोट सुरक्षितता प्रशिक्षण होणार आहे. बोट मालक, चालकांनी सहभागी व्हावे,…

Read More

बँडपथक चालक मालकांची २३ रोजी बैठक

⚡मालवण ता.२०-; मालवण पोलीस ठाणे हद्दीतील डिजे, डॉल्बी, स्पीकर, बँडपथक, ढोल-ताशा, बेंजो चालक- मालक यांची आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तहसीलदार तसेच मालवण पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मालवण पोलीस ठाणे येथील बहुद्देशीय हॉल येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना देण्यात येणार आहेत. बैठकीस…

Read More

चार दिवसानंतर रस्त्यातील खड्यांत करणार वृक्षारोपण

एसटी स्टँड परिसरातील खड्यांबाबत आगार प्रमुखांचे वेधले लक्ष;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२०-: आठ दिवसांवर गणेश चतुर्थी आली असताना देखील सावंतवाडी बस स्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष…

Read More

नगर परिषदेला जाब विचारणारा वाली नाही

त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर आले असताना नियोजन नाही;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.२०-: आठ दिवसांवर कोकणातील सर्वात मोठे सण गणेश चतुर्थी आली असताना देखील सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून नियोजन संदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसून, सद्य स्थितीत जाब विचारणारे कोणी नसल्याने प्रशासनाचे कामकाज धीम्यागतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे….

Read More

शालेय समुहगान स्पर्धेत विविध शाळांचे यश

⚡वेंगुर्ला ता.२०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १६ ऑगस्ट रोजी शालेयस्तरीय समुहगान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वेंगुर्ला शाळा क्रमांक २, वेंगुर्ला शाळा क्रमांक ४, वेंगुर्ल हायस्कुल व बॅ. खर्डेकर महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावले. ही स्पर्धा प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि खुला अशा चार गटात घेण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन…

Read More

शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना कणकवलीत मराठा समाज वाहणार श्रद्धांजली

⚡कणकवली ता.२०-: मराठा समाजाचे नेते कै. विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जगभरातील मराठा समाजाने त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहेमराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यापासून विविध प्रश्नांवर तळमळीने लढा देणारा मराठा समाजाचा लढवय्या नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार २१ मराठा समाजाच्या वतीने…

Read More

सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची ७८ वी जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी येथील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 78 व्या जयंती उत्सवानिमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सावंतवाडी तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास भाई सावंत महिला काँग्रेस प्रांतिक सदस्य विभावरी सुकी शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर चंद्रकांत राणे…

Read More

महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स ॲण्ड ॲपरल्स चे शानदार उद्घाटन…

महालक्ष्मी शू पॅलेस आणि महालक्ष्मी सुपर बाझार नंतर गारमेंट्स ॲण्ड ॲपरल्स क्षेत्रात प्रदार्पण… ⚡सावंतवाडी ता.२०-: महालक्ष्मी शू पॅलेस आणि महालक्ष्मी सुपर बाझार यांच्या घवघवीत यशानंतर आज सावंतवाडी येथे महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँण्ड ॲपरल्स या नूतन शॉपचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालय वकील तथा मानद सचिव भारतीय रायफल संघ अँड. श्री. विक्रम…

Read More

माठेवाडा मित्र मंडळाकडून संजू परब व पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१९-: माठेवाडा येथील दहीहंडी उत्सव निमित्त संजू परब यांनी आज मंडळाला भेट दिली असता. मंडळाकडून संजू परब आणि पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला. तसेच दोघांनाही मंडळाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बाळा चोडणकर संदेश टेमकर अवधूत नाटेकर नंदू गावडे देवा टेमकर सत्यवान बांदेकर,आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस साजरा

⚡सावंतवाडी ता.१९-: सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी रवी मडगावकर,सुनील राऊळ, प्रल्हाद मोहिनी मडगावकर; आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page