⚡वेंगुर्ला ता.२०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १६ ऑगस्ट रोजी शालेयस्तरीय समुहगान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वेंगुर्ला शाळा क्रमांक २, वेंगुर्ला शाळा क्रमांक ४, वेंगुर्ल हायस्कुल व बॅ. खर्डेकर महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
ही स्पर्धा प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि खुला अशा चार गटात घेण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलिप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमित सोंडगे, नगरपरिषद अधिक्षक संगिता कुबल, माजी सभापती सुचिता वजराटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम- वेंगुर्ला शाळा क्रमांक २, द्वितीय- वेंगुर्ला शाळा क्रमांक ४, तृतीय क्रमांक- मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कुल यांनी पटकावले. उच्च प्राथमिक गटात प्रथम-वेंगुर्ला शाळा क्रमांक ४, द्वितीय क्रमांक- वेंगुर्ला शाळा क्रमांक २, तृतिय क्रमांक-वेंगुर्ला शाळा क्रमांक ३ ने पटकाविला. माध्यमिक गटात प्रथम- वेंगुर्ला हायस्कुल, द्वितीय-पाटकर हायस्कुल, तृतिय-मदर तेरेसा, तर खुल्या गटात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयने प्रथम कमांक पटकावला. या स्पर्धेचे परिक्षण प्रार्थना हळदणकर व अॅड. प्रथमेश नाईक यांनी केले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण सावंतवाडीचे प्रांत प्रशांत पानवेकर, मुख्यधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, निवडणुक नायब तहसिलदार संदिप पानमंद यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न. प. चे माजी पदाधिकारी, शहरातील सर्व शाळांचे शिक्षक व नगरपरिषद कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
