नगर परिषदेला जाब विचारणारा वाली नाही

त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर आले असताना नियोजन नाही;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप

⚡सावंतवाडी ता.२०-: आठ दिवसांवर कोकणातील सर्वात मोठे सण गणेश चतुर्थी आली असताना देखील सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून नियोजन संदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसून, सद्य स्थितीत जाब विचारणारे कोणी नसल्याने प्रशासनाचे कामकाज धीम्यागतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येथे येत असतात. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याबाबत दरवर्षी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन केले जाते. परंतु, गणेश चतुर्थी आठ दिवसांवर आली असताना देखील अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page