चार दिवसानंतर रस्त्यातील खड्यांत करणार वृक्षारोपण

एसटी स्टँड परिसरातील खड्यांबाबत आगार प्रमुखांचे वेधले लक्ष;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२०-: आठ दिवसांवर गणेश चतुर्थी आली असताना देखील सावंतवाडी बस स्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आगार व्यवस्थापकाचे लक्ष वेधत त्यांना जाब विचारला आहे.

यावेळी येत्या चार दिवसात बस स्थानक परिसरातील खड्डे न बूजवल्यास त्या खड्ड्यात वृक्षारोपण करणार असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान , इफतिकार राजगुरु, बावतिस फर्नांडिस, संतोष जोईल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page