⚡मालवण ता.२०-; मालवण पोलीस ठाणे हद्दीतील डिजे, डॉल्बी, स्पीकर, बँडपथक, ढोल-ताशा, बेंजो चालक- मालक यांची आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तहसीलदार तसेच मालवण पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मालवण पोलीस ठाणे येथील बहुद्देशीय हॉल येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना देण्यात येणार आहेत. बैठकीस वाद्यधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बँडपथक चालक मालकांची २३ रोजी बैठक
