⚡कणकवली ता.२०-: मराठा समाजाचे नेते कै. विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जगभरातील मराठा समाजाने त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यापासून विविध प्रश्नांवर तळमळीने लढा देणारा मराठा समाजाचा लढवय्या नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार २१ मराठा समाजाच्या वतीने सकाळी १०.३० वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
मराठा समाजातील सर्व बांधवांनी कणकवलीतील मराठा मंडळाच्या सभागृहात एकत्रित येऊन कै. विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करावयाची आहे.
तरी आपण सर्वांनी वेळीच उपस्थित राहून लढवय्या नेत्याला आदरांजली अर्पण करूया असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत उपस्थित राहणार आहेत.
तरी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते,पदाधिकारी व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मराठामंडळाचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.
