महालक्ष्मी शू पॅलेस आणि महालक्ष्मी सुपर बाझार नंतर गारमेंट्स ॲण्ड ॲपरल्स क्षेत्रात प्रदार्पण…
⚡सावंतवाडी ता.२०-: महालक्ष्मी शू पॅलेस आणि महालक्ष्मी सुपर बाझार यांच्या घवघवीत यशानंतर आज सावंतवाडी येथे महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँण्ड ॲपरल्स या नूतन शॉपचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालय वकील तथा मानद सचिव भारतीय रायफल संघ अँड. श्री. विक्रम उर्फ मेघश्याम भांगले यांच्या हस्ते फीत कापून या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी श्री. प्रशांत पानवेकर, जिल्हा परिवहन अधिकारी श्री. नंदकिशोर काळे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके, सावंतवाडी पोलिस निरीक्षक श्री. शंकर कोरे, एस.बी.आय. रत्नागिरी क्षेत्रीय व्यवसाय मुख्य प्रबंधक श्री. विशाल स्वामी, एस. बी. आय मुख्य प्रबंधक अमोल माने, ह्युमन राईट्स कोकण विभागीय अध्यक्ष श्री. संतोष नाईक आदी मान्यवराच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी श्री. कांता कोंडल्याळ, सौ. रंजना कोंडल्याळ, श्री. विनायक कोंडल्याळ, सौ. दीपज्योती कोंडल्याळ, श्री. रामचंद्र कोंडल्याळ, सौ. वर्षा कोंडल्याळ, संपूर्ण परिवार तसेच मित्रमंडळी उपस्थित होते.
