Headlines

कणकवलीत मोहरमनिमित्त ताबूत फेरी…!

कणकवली : मोहरमनिमित्त वरवडे येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने कणकवली शहरातून प्रतिवर्षाप्रमाणे ताबूत फेरी उत्साहात काढण्यात आली. ढोल – ताशांच्या गजरात आणि धार्मिक श्रद्धेतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

ताबूत फेरीची सुरुवात वरवडे येथून होत ही कलमठ – मुख्य बाजारपेठ – पटकीदेवी त्यानंतर तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मुंब ई- गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडने पुन्हा वरवडे येथे नेण्यात आली.

मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी ताबूताचे स्वागत केले. शहरवासीयांनी या ताबूत फेरीत श्रीफळ अर्पण करून गाऱ्हाणे घालत धार्मिक सलोखा आणि परंपरेप्रती असलेला श्रद्धा भाव दाखविला. या प्रसंगी वरवडे परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही ताबूत फेरी पोलीस बंदोबस्तात शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि परंपरेचे दर्शन घडविणारी ही ताबूत फेरी विशेष आकर्षण ठरली.

You cannot copy content of this page