Headlines

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीस जामीन…

कुडाळ : खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप असलेल्या कुडाळ येथीलसंशयित आरोपी रमेश चव्हाण याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. स्वतःच्या बायकोला कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,115(2) आणि 351(3)अन्वये अटक करण्यात आली होती.
यानंतर आरोपीच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या जामीन अर्जाचे सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. दत्ताराम राजीव बिले यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस.एम.देशपांडे यांनी आरोपीची 15000/- हजार रुपयांच्या मुचलक्यावर आणि काही अटी शर्तीसह आरोपीची जामिनावर मुक्तता केली.
या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत आरोपीच्या वतीने ॲड. राजीव दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी कायदेशीर बाजू मांडली.

You cannot copy content of this page