Headlines

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पालकमंत्री नितेश राणे यांचे विनम्र अभिवादन

सिंधुदुर्ग, दि. २६ (जिमाका) : जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

You cannot copy content of this page