Headlines

कातकरी मुलांना साहित्य वाटप करीत पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा

भाजप युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम कुडाळ:जीवनात मी अनेक ठिकाणी दान केलं. पण आज मी ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना दान करण्यासाठी आलोय तो माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. त्यामुळे भविष्यात अशा कातकरी समाजासाठी जे काय करता येईल त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. मी माझ्या कातकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडू देणार नाही. त्यांच्यासाठी…

Read More

गणित संबोध परीक्षेमध्ये आरपीडीचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.सहदेव राऊळ : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता…

Read More

वनविभाग विरोधातील आंबोली ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे…

आंबोली, ता.१९: वनविभाग विरोधात आंबोलीत ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन संध्याकाळी मागे घेण्यात आले.उपवनसंरक्षक श्री. खाडे यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे पत्र दिले तसेच माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंबोलीत वन्य प्राणी नुकसान करत असून जमिनी महाराष्ट्र शासन सात बारा…

Read More

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले चित्त्याचे मुखवटे

⚡मालवण ता.१९-: भारतातून १९५२ साली चित्ता प्राणी नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर ७२ वर्षांनी भारतात चित्त्याचे पुनरागमन झाले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चित्त्या बद्दल असलेले कुतूहल लक्षात घेऊन कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागामार्फत फेस पेंटिंगच्या माध्यमातून मुलांचे चित्त्याच्या रूपातील मुखवटे रंगवण्यात आले. यावेळी चित्त्याच्या मुखवट्यातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन चित्यांविषयी माहिती दिली….

Read More

“तुझी माझी लव्ह स्टोरी” मध्ये सावंतवाडीतील चिमुकल्यांची धूम…

टिप्स-मराठीवर गाणं प्रदर्शित;ओम आणि श्रीयाच्या अभिनयाने रंगत… सावंतवाडी ता. १९: “तुझी माझी लव्ह स्टोरी होईल का सक्सेस” या टिप्स मराठीच्या नव्या गाण्यामध्ये सावंतवाडी येथिल अवघ्या ९ वर्षाच्या ओम टेंबकर आणि श्रीया पटेकर या दोन चिमुरड्यांनी नेटकर्‍याचे लक्ष वेधून घेतले आहे. “मिस्टर प्रो” म्हणून प्रसिध्द असलेले अभिनेते प्रफुल्ल घाडी आणि अभिनेत्री सेजल नायकरे या दोघां कलाकारांनी…

Read More

भिरवंडे येथील सुरेश सावंत यांचे निधन

⚡कणकवली ता.१९-: कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस तसेच भिरवंडे मुरडवेवाडी गावचे सुपुत्र, देवालये संचालक मंडळ भिरवंडेचे संचालक, भिरवंडेकर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष व अग्रणी सामाजिक कार्यकर्तेसुरेश शांताराम सावंत (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळचे नुकसान झाले आहे सुरेश सावंत यांनी…

Read More

पूर्वा गावडेचे जलतरण स्पर्धेत मोठे यश

जलतरण स्पर्धेतमध्ये 5 रौप्यपदके , 2 कांस्य पदकाची कमाई;कोल्हापूर येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेत मिळवले यश ⚡ओरोस ता.१९-: सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारात 5 रौप्यपदके आणि 2 कांस्य पदकाची कमाई केली आहे यापुर्वीही भुवनेश्वर व अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण…

Read More

महान मंग्रो ग्रोव्हर्स को- ऑपरेटिव्ह सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी २२ सप्टेंबरला…

⚡मालवण ता.१९-: हडी, रेवंडी, कांदळगाव, कोळंब, सर्जेकोट, महान मँगो ग्रोव्हर्स को – ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित कांदळगाव तालुका मालवण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता संस्थेच्या ओझर येथील कार्यालयात सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण (दिपक) परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत आंबा खरेदी विक्री बाबत धोरणात्मक चर्चा करण्यात येणार…

Read More

महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत साक्षी रावराणे हीची मुंबई विद्यापीठ स्तरावर निवड…

वैभववाडी संजय शेळकेरत्नागिरी- देवरुख कॉलेज येथे झालेल्या विभाग स्तरीय (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ) अंतरमहविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मुलींच्या संघामधून साक्षी जयवंत रावराणे हिची महिला एकेरी मधून मुंबई विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे. ही स्पर्धा मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ग्रामीण विभागासाठी आयोजित केली होती. स्पर्धेत इतर महाविद्यालयातून मुलांचे अठरा तर मुलींचे…

Read More

मालवण येथील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन चौथ्या दिवशी ही सुरूच…

मालवण दि प्रतिनिधीगेल्या दोन महिन्यात ठेकेदाराने ठरविलेल्या पगाराप्रमाणे पगार न दिल्याने तसेच पगार वाढ न करणे, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क, पीपीटी किट, ड्रेसकोडसह इतर मागण्यांसाठी मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी शुक्रवार पासून पुकारलेले काम बंद आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरू ठेवले. या काम बंद आंदोलनामुळे मालवण शहरात उद्भवणाऱ्या कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन मालवणचे माजी नगराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page