महान मंग्रो ग्रोव्हर्स को- ऑपरेटिव्ह सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी २२ सप्टेंबरला…

⚡मालवण ता.१९-: हडी, रेवंडी, कांदळगाव, कोळंब, सर्जेकोट, महान मँगो ग्रोव्हर्स को – ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित कांदळगाव तालुका मालवण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता संस्थेच्या ओझर येथील कार्यालयात सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण (दिपक) परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या सभेत आंबा खरेदी विक्री बाबत धोरणात्मक चर्चा करण्यात येणार असून व इतर विषयांवरही महत्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. या सभेस संस्थेच्या संचालक मंडळ व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव सुधीर साळसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page