गणित संबोध परीक्षेमध्ये आरपीडीचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.सहदेव राऊळ : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी राणी पार्वतीदेवी इयत्ता हायस्कूलमधून इयत्ता पाचवी व आठवीमध्ये अनुक्रमे १२ व ३९ असे एकूण ५१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. इयत्ता पाचवीतील कु. दिप तुळशीदास पित्रे ( प्रथम ), कु. श्रावणी लाडू निचम व कु. साईराज सुनिल राऊळ ( संयुक्तपणे द्वितीय) व कु. विराज अनंत नाईक (तृतीय) यांच्यासह सर्व १२ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच इयत्ता आठवीमधून कु. ओजस गोकूळदास मेस्त्री ( प्रथम ), कु. गावडे काजल सुभाष, कु. नाईक दुर्वा दशरथ व कु. बांदेकर अथर्व भारत ( संयुक्तपणे द्वितीय) तसेच कु. कुडव अभिजीत उत्तम व कु. मालवणकर अथर्व बाबुराव (संयुक्तपणे तृतीय) यांच्यासह १८ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली. सर्व विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक व पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर यांनी अभिनंदन करून व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page