आंबोली, ता.१९: वनविभाग विरोधात आंबोलीत ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन संध्याकाळी मागे घेण्यात आले.उपवनसंरक्षक श्री. खाडे यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे पत्र दिले तसेच माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
आंबोलीत वन्य प्राणी नुकसान करत असून जमिनी महाराष्ट्र शासन सात बारा असल्याने नुकसान भरपाई मिळत नाही.त्यावर प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामा याद्वारे नुकसान भरपाई मिळावी.सौर कुंपण घालावे.हत्ती येथून स्थलांतर करावा,याठिकाणी हत्ती अधिवास करू नये यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी संध्याकाळी उपवनसंरक्षक श्री खाडे यांच्याकडून मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देवून मार्गदर्शन मागवून पाठपुरावा करण्याचे पत्र सरपंच सावित्री पालेकर यांना दिले.तसेच राजन तेली यांनी वनमंत्री याच्याशी चर्चा करून तोडगा काडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच सावित्री पालेकर,संतोष पालेकर,विद्यासागर गावडे,नमिता राऊत,श्री गावडे,श्री राऊत,महादेव गावडे,श्री.नार्वेकर,श्री दळवी,श्री पडवळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
