वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले चित्त्याचे मुखवटे

⚡मालवण ता.१९-: भारतातून १९५२ साली चित्ता प्राणी नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर ७२ वर्षांनी भारतात चित्त्याचे पुनरागमन झाले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चित्त्या बद्दल असलेले कुतूहल लक्षात घेऊन कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागामार्फत फेस पेंटिंगच्या माध्यमातून मुलांचे चित्त्याच्या रूपातील मुखवटे रंगवण्यात आले. यावेळी चित्त्याच्या मुखवट्यातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन चित्यांविषयी माहिती दिली.

या उपक्रमासाठी प्रशालेतील हरहुन्नरी विद्यार्थी द्वितीज गवाणकर, ममता अंगचेकर, अनिरुद्ध गायकवाड, श्रेया चांदरकर या विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक समीर चांदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे सुंदर मुखवटे रंगवले. यासाठी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग दर्शवला. यासाठी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक भूषण गावडे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वी झाला.

यावेळी चित्त्याच्या मुखवट्यातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन चित्यांविषयी माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणात प्रत्येक प्राण्याचे महत्त्व फार मोलाचे आहे याची जाणीव जागृती मुलांमध्ये निर्माण झाली. या उपक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचेे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page