कातकरी मुलांना साहित्य वाटप करीत पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा

भाजप युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम

कुडाळ:जीवनात मी अनेक ठिकाणी दान केलं. पण आज मी ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना दान करण्यासाठी आलोय तो माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. त्यामुळे भविष्यात अशा कातकरी समाजासाठी जे काय करता येईल त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. मी माझ्या कातकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडू देणार नाही. त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते सातत्याने मी करत राहीण. आणि या कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला माझ्या वतीने मी जमेल तसे मदत करत राहील. असे सांगत या समाजातील मुलांसाठी भाजपचे युवा उद्योजक विशाल परब यांनी गौरवोद्गार काढले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील शोषित मुक्ति अभियान संस्थेच्या
नाग्या महादू निवासी वसतिगृहातील वेताळबांबर्डे येथील कातकरी समाजाच्या मुलांना मोफत दप्तरे, शालेय साहित्य, खाऊ,लाडू,मिठाई, वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने विशाल परब यांच्या सहकार्यातून वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना विशाल परब यांनी आपल्या मुलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, या संस्थेचे उदय आईर, आनंद परब, विकास परब, तेजस माने यास अनेक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे. या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वतीने जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आलेह याशिवाय शालेय दप्तरा बरोबर शालेय साहित्यांचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यावेळी विशाल परब यांनी या विद्यार्थ्यांमध्ये स्वतः रमामान होत या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या देशभक्तीपर गीता च्यावेळा विशाल परब आणी त्यांच्या सोबत उपस्थित असलेले भाजपचे कार्यकर्ते रममाण होऊन गेले होते. आपण पण गरिबी बघितली आहे. पण अशाच गरिबीतून ही मुलं मात करून भविष्यात कातकरी समाजातूनच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यासारखे अधिकारी निर्माण होतील. असे सांगत या मुलांच्या शिक्षणाचा भार भविष्यात आपण उचलणार असल्याची घोषणा विशाल परब यांनी केली. या मुलांसोबत स्वतः विशाल परब बराच वेळ रमून गेले होते.या मुलांशी काही वेळ रममान होत त्यांनी गप्पा गोष्टी केल्या.

You cannot copy content of this page