भिरवंडे येथील सुरेश सावंत यांचे निधन

⚡कणकवली ता.१९-: कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस तसेच भिरवंडे मुरडवेवाडी गावचे सुपुत्र, देवालये संचालक मंडळ भिरवंडेचे संचालक, भिरवंडेकर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष व अग्रणी सामाजिक कार्यकर्ते
सुरेश शांताराम सावंत (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.

त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळचे नुकसान झाले आहे सुरेश सावंत यांनी सन २००२ ते २००३ पर्यंत २ वर्षे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे चिटणीस म्हणून काम पाहिले तसेच सन २००४ पासून सलग १८ वर्षे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस म्हणून एकहाती धूरा सांभाळली. तसेच रामेश्वर मंदिर देवालये संचालक मंडळ संचालक म्हणून ते अनेक वर्षापासून कार्यरत होते

You cannot copy content of this page