Headlines

आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा ख्याल गायन स्पर्धेत सावनी शेवडेला विशेष पारितोषिक

⚡कणकवली ता.२४-:गानवर्धन पुणे व स्वरमयी गुरुकुल आयोजित आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा ख्याल गायन स्पर्धेत देवगड येथील सावनी शेवडे हिला विशेष पारितोषिक मिळाले आहे. हा पारितोषिक सोहळा टिळक स्मारक मंदिर पुणे येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि शैक्षणिक विचारवंत डॉ. शां. बां. मुजुमदार, विदुषी कलापिनी कोमकली उपस्थित होते. ज्येष्ठ…

Read More

मातोश्री मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२४-: येथील मातोश्री कला क्रिडा मंडळातर्फे दि.२६ नोव्हेंबर ते दि. ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत दाभोली नाका-वेंगुर्ला येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) सायंकाळी दुर्गामातेचे सवाद्य मिरवणूकीने आगमन तर नवरात्रोत्सवा दरम्यान रोज सकाळी ९ वाजता दुर्गा मातेची नित्य पूजा, दुपारी १२ नैवेद्य आणि सायंकाळी ६.३० वाजता भजन आणि ७.३० वाजता महाआरती…

Read More

मळेवाड गावात पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प नको

मळेवाड जकात नाका व्यापारी संघटनेच्यावतीने मळेवाड- कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: मळेवाड, आजगाव, धाकोरे गावात होऊ घातलेल्या खनिज प्रकल्पामुळे मळेवाड गावात घरांची पडझड तसेच शेती बागायती, आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार असून याचा त्रास पुढील पिढीला भोगावा लागणार आहे. त्यामुळे असा ,पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प आपल्या गावात नको, असे निवेदन मळेवाड जकातनाका…

Read More

सेवानिवृत्त झालेल्या त्या शिक्षकांनी
शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

पेन्शनर्स असोसिएशनचे मनोहर आंबेकर, सुरेश पेडणेकर यांचे आवाहन ⚡कणकवली ता.२४-: काही प्राथमिक शिक्षक १ जुलै १९७२ रोजी अथवा त्यानंतरच्या दिनांकाला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू होऊन काही अपरिहार्य कारणास्तव प्रशिक्षित होऊ न शकल्यामुळे अप्रशिक्षित म्हणून सेवानिवृत्त झाले. अशा शिक्षकांना शासनाने सेवानिवृत्ती विषयक सर्वप्रकारचे आर्थिक लाभ नाकारले होते. हा त्यांच्यावर झालेला अन्याय होता. त्याखातर महाराष्ट्र पेन्शनर्स…

Read More

वरवडे ग्रा.पं. व सावली फाउंडेशनतर्फे हॅन्डवॉश,साबण, वॉशिंग पावडर बनविण्याचे प्रशिक्षण

⚡कणकवली ता.२४-: वरवडे ग्रामपंचायत व सावली फाउंडेशनच्या वतीने वरवडे गावातील महिलांना फिनेल हॅन्ड वॉश कपड्याचे साबण वॉशिंग पावडर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना तसेच युवकांना स्वयंम रोजगार मिळून आर्थिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या हेतूने संस्था काम करत आहे यापुढील काळात शिक्षणासोबत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या किंवा ग्रामस्थांच्या व्यवसाय उद्योगधंद्याच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात प्रशिक्षण देण्याचा सावली…

Read More

.. अन्यथा युवती राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल : सावली पाटकर

⚡सावंतवाडी ता.२४-: शिंदे गटाच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे याच्या फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटोचे इडीटींग करून खासदार सुप्रिया सुळे ह्या मुख्यमंत्री महोदयांच्या खुर्चीवर बसल्यचे दाखवत असलेला फोटो फेसबुक पेजवर पोस्ट केले. या सगळ्या मागे खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिमा मलीन करणे व त्यंची बदनामी करणे हाच त्यांचा हेतू आहे. समजामध्ये बदनामीकारक माहिती पसरविनाऱ्या…

Read More

रोणापालमध्ये नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२४-: रोणापाल येथील माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त २९ व ३० सप्टेंबर रोजी निमंत्रितांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २६ सप्टेंबर रोजी देवीची विधीवत पूजा व घटस्थापना, रात्री ८ वा. किर्तन, मंगळवार २७ रोजी स्थानिकांची भजने, बुधवार २८ रोजी रात्री ८ वा….

Read More

गोव्यात येणाऱ्या खनिज वाहतूकीवर गोवा सरकारकडून रॉयल्टी

डंपरचालक मालक संघटना आक्रमक ⚡बांदा ता.२४-: महाराष्ट्रातून गोव्यात होणार्‍या खनिज वाहतुकीवर ५०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत रॉयल्टी आकारण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून सुरु झाली आहे. याबाबत डंपर चालकांमध्ये असंतोष पसरला असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पेडणे मामलेदार श्री. मुळीक…

Read More

फटाके लावून घोषणाबाजी व जल्लोष शिवसैनिकांना भोवला

कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल ⚡कणकवली ता.२४-: शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कणकवली श्रीधर नाईक चौक येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी फटाके लावून घोषणाबाजी व जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष कणकवलीतील शिवसैनिकांना भोवला असून, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी…

Read More

चोरीचा विशेष पथक नेमून तपास करावा

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पोलिसांचे वेधले लक्ष ⚡कणकवली ता.२४-: कणकवली शहरात एकाच वेळी एका कॉम्प्लेक्समधील तब्बल दहा फ्लॅट फोडून चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीचा विशेष पथक नेमून तपास करावा अशी मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली. या घरफोडी संदर्भात कॉम्प्लेक्स मधील नागरिकांना माहिती…

Read More
You cannot copy content of this page