रोणापालमध्ये नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२४-: रोणापाल येथील माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त २९ व ३० सप्टेंबर रोजी निमंत्रितांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २६ सप्टेंबर रोजी देवीची विधीवत पूजा व घटस्थापना, रात्री ८ वा. किर्तन, मंगळवार २७ रोजी स्थानिकांची भजने, बुधवार २८ रोजी रात्री ८ वा. सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब पुरस्कृत अष्टविनायक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
गुरुवार २९ रोजी दोन दिवसीय निमंत्रितांच्या भजन स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय ५ हजार रुपये व चषक, तृतीय ४ हजार रुपये व चषक, उत्तेजनार्थ ३ हजार रुपये व चषक देण्यात येईल. तसेच उत्कृष्ट गायक, तबलावादक, हार्मोनियम वादक, पखवाजवादक, झांजवादक, कोरस व उत्कृष्ट श्रोता यांना प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

शनिवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, रविवार २ रोजी चपई नृत्य, सोमवार ३ रोजी सत्संग, मंगळवार ४ रोजी होम मिनीस्टर, संगीत खुर्ची व दिपोत्सव कार्यक्रम होईल. बुधवार ५ रोजी दसरा, देवलग्न व पावणी कार्यक्रमाने सांगता होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

फोटो – रोणापाल माऊली

You cannot copy content of this page