मळेवाड गावात पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प नको

मळेवाड जकात नाका व्यापारी संघटनेच्यावतीने मळेवाड- कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: मळेवाड, आजगाव, धाकोरे गावात होऊ घातलेल्या खनिज प्रकल्पामुळे मळेवाड गावात घरांची पडझड तसेच शेती बागायती, आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार असून याचा त्रास पुढील पिढीला भोगावा लागणार आहे. त्यामुळे असा ,पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प आपल्या गावात नको, असे निवेदन मळेवाड जकातनाका व्यापारी संघटनेने व ग्रामस्थांनी मळेवाड- कोंडुरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे यांना दिले.

यावेळी मळेवाड व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे, उपाध्यक्ष रमाकांत नाईक, माजी पंचायत समिती सदस्य बाळ शिरसाट, प्रकाश पार्सेकर, अशोक शिरसाट, मदन मुरकर आदी उपस्थित होते.
मळेवाड, आजगाव, धाकोरे तसेच शिरोडा गावात खनिज प्रकल्पासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. यामुळे गावात खनिज प्रकल्पाची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकल्पामुळे गावात नैसर्गिकदृष्ट्या तसेच घरांची, शेती बागायती, आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार असून याचा त्रास पुढील पिढीला भोगावा लागणार आहे.
त्यामुळे मळेवाड येथील व्यापारी बंधू व ग्रामस्थांनी एकत्र येत या खनिज प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प आपल्या गावात नको असे त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page